Saturday, October 10, 2026
Homeक्राईमवाळूच्या अवैध वाहतुकीवर एलसीबीचा छापा

वाळूच्या अवैध वाहतुकीवर एलसीबीचा छापा

5.20 लाखांचा मुद्देमाल जप्त || शेवगाव तालुक्यात कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून, शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉली आणि वाळूसह एकूण 5 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बाबु अकबर बेग (वय 31, रा. ढोरजळगाव, ता. शेवगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अंमलदार निळकंठ कारखेले, सुनील पवार, विशाल तनपुरे, भगवान सानप यांचे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरूवारी (8 ऑक्टोबर) शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना, ढोरजळगाव गावच्या शिवारात भातकुडगाव येथून ढोरजळगावच्या दिशेने ट्रॅक्टर-ट्रॉलीतून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक बाबु बेग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे समोर आले. याप्रकरणी बाबु अकबर बेग याच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिकच; तापमानात २ ते ७ अंशांची वाढ

0
नाशिक | प्रतिनिधी राज्यात यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक तीव्रतेने जाणवत असून, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाने सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांची वाढ नोंदवली आहे....