Saturday, May 4, 2024
Homeनगरकोपरगावात वाळूचोरांवर कारवाई

कोपरगावात वाळूचोरांवर कारवाई

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून पोलिसांनी वारी ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कारवाईत स्वराज कंपनीच्या 2 ट्रॅक्टरसह लाल व निळ्या रंगाचे ट्रेलर त्यात दीड ब्रास वाळूसह 10 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून आरोपी सुनील अशोक बारहाते, रा. सडे, व महेश बाबुराव घोडके, रा. भोजडेचौकी याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीतून वाळूचोर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत आहेत. या वाळूचोरीत आतापर्यंत वाळू चोर सहभाग घेत. मात्र अलीकडील काळात पोलीस, महसूल अधिकारी, राजकीय नेत्यांचाही या लुटीत सहभाग असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. गोदावरी पात्रात आता फार थोडी वाळू शिल्लक राहिली आहे. मात्र तिच्यावरही वाळूचोरांची नजर आहे. अशीच घटना नुकतीच वारी येथे घडली असून तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास दोन स्वराज कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रेलरसह ट्रॅक्टर अंदाजे दीड ब्रास वाळू चोरी करताना आढळले होते.

त्यानुसार अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व कोपरगाव तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी सुनील अशोक बारहाते रा. सडे व महेश बाबुराव घोडके रा. भोजडे चौकी यांना वाळूचोरी करताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. त्यांच्या विरुद्ध अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो. कॉ. शिवाजी अशोक ढाकणे यांनी गु. र. नं. 210/2023 भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

ही कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो. कॉ. शिवाजी ढाकणे, पो.ना. सचिन डबल, पो. कॉ. रोहीत मिसाळ, सागर ससाणे तसेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉ ए. आर. वाखुरे, पो. कॉ. आर. सी. कोतकर यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या