Tuesday, November 26, 2024
HomeमनोरंजनSandalwood Drug Case : अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरी पोलिसांचा छापा

Sandalwood Drug Case : अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरी पोलिसांचा छापा

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या (Vivek Oberoi) मुंबईमधील घरावर बंगळूरू पोलिसांनी आज छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1 च्या सुमारास ही छापेमारी झाली असून यामध्ये 2 बंगळूरू पोलिस त्याच्या घरू पोहचले होते. दरम्यान पोलिस विवेकचा मेव्हणा आदित्य अल्वा (Aditya Alva) याची ड्रग्जच्या प्रकरणामध्ये चौकशी आणि तपास करत आहेत.

- Advertisement -

कर्नाटकचे माजी मंत्री जीवाराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा याचा अमली पदार्थ प्रकरणात बेंगळुरू पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचे कनेक्शन समोर आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , विवेक ओबेरॉय हा आदित्य अल्वाचा नातेवाईक आहे. ‘आदित्य हा विवेक ओबेरॉयच्या घरी लपला असावा अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही न्यायालयातून वॉरंट मिळवले आणि केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकच्या घरात धडक दिली’, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या