वावी | वार्ताहर | Vavi
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी (Vavi) येथे दुसंगवाडी शिवारात अज्ञात चोरट्यांनी (Theives) एकाच रात्री जवळपास पाच ते साडेपाच लाखांचे चंदन (Sandalwood) चोरून नेल्याची घटना मंगळवार (दि.०६) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
हे देखील वाचा : Nashik Fraud News : द्राक्ष निर्यातदाराकडून शेतकऱ्यांची १४ लाखांची फसवणूक
वावी येथील माजी सरपंच कन्हैयालाल भुतडा यांचे मिळकत क्रमांक 807/1/2 या गटात जवळपास ९०० झाडांची (Tree) लागवड केलेली आहे. गेल्या दहा वर्षापासून भूतडा यांनी या चंदन बागेचे संगोपन करून जवळपास अडीच एकर क्षेत्रात ९०० चंदनाची झाडी जगविले असून आज काही झाडे कापणीस देखील आली आहेत.अशा परिस्थितीत अज्ञात चोरट्यांनी भुतडा यांच्या चंदन बागेत हाती आलेल्या पीक चोरून नेल्याने चंदन शेती धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे देखील वाचा : आदिवासी बहुल जिल्ह्यांत आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांची माहिती
तसेच घराजवळचे चंदनाचे झाड (Sandalwood Tree) आडवे पडल्याचे पाहुन भुतडा यांच्या कामगारास (Worker) शंका निर्माण झाली. त्यानंतर संपूर्ण बागेची पाहणी केली असता जवळपास दहा ते बारा चंदनाची झाडे चोरट्यानी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यास (Vavi Police Station) कळविले असता त्यांनी संबंधित गुन्हा हा वनविभागाच्या अंतर्गत येत असल्याचे सांगितले. तर वनविभागाकडून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा असे म्हटले. त्यामुळे गुन्हा नेमका नोंदवायचा कुणाकडे असा प्रश्न संबंधित शेतकऱ्याला पडला आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती…”; अजित पवारांचे दिंडोरीत मोठे विधान
एकीकडे शासनाकडून चंदन शेतीसाठी शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे. मात्र, शासनाकडून सुरक्षा विमा कवच अथवा संरक्षण याबाबत कुठलेही पावले उचलली जात नाही. तसेच चंदन चोरांच्या बाबतीत कठोर कारवाई देखील केली जात नाही. त्यामुळे चंदन शेतीच्या बाबतीत राज्य शासनाने निर्णायक पाऊले उचलावी जेणेकरून चंदन शेतकऱ्यांना योग्य दिलासा मिळेल.
कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच, वावी
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा