Monday, May 27, 2024
Homeनगरवराळ हत्याकांड : दोघांचा जामीन अर्ज नामंजूर

वराळ हत्याकांड : दोघांचा जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील बहुचर्चित संदीप वराळ हत्याकांडातील आरोपी प्रविण रसाळ आणि ऋषिकेश उर्फ भैय्या भोसले या दोघांचा मोक्का गुन्ह्यातील जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मिलींद कुर्तडीकर यांनी हा निर्णय दिला. पारनेर तालुक्यातील निघोज गावचे माजी सरपंच संदीप वराळ यांची 21 जानेवारी 2017 हत्या करण्यात आली होती.

- Advertisement -

या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर आरोपी प्रविण रसाळ, माऊली रसाळ, विकास रसाळ, पिंट्या रसाळ, ऋषिकेश उर्फ भैय्या भोसले, नागेश लोखंडे, राहुल साबळे, अक्षय लुढे, प्रशांत बर्डे, प्रशांत वराळ, राजू भंडारी आणि मुक्तार इनामदार यांच्याविरूद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.

प्रविण रसाळ आणि ऋषिकेश उर्फ भैय्या भोसले या दोघांनी जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर युक्तिवाद होऊन प्रविण रसाळ हा हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार असल्याने आणि आरोपी भैय्या भोसले याचा हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असल्याने न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या