Friday, November 22, 2024
Homeनगरसांदण दरी पावसाळा संपेपर्यंत पर्यटकांना बंद

सांदण दरी पावसाळा संपेपर्यंत पर्यटकांना बंद

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

राज्यात विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर तोबा गर्दी होत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागाकडून अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेतील प्रसिद्ध सांदण दरी पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच पुढील चार महिने पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. सांदण दरी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे पावसाळी सहलीसाठी दाखल होतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील सर्वात मोठी सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या