Thursday, October 24, 2024
Homeनगरविधानसभेसाठी संगमनेरच्या मैदानात लढा

विधानसभेसाठी संगमनेरच्या मैदानात लढा

आमदार थोरात यांचे महसूल मंत्री विखेंना आव्हान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी येथे आदिवासी मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आ. थोरातांनी भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रतिक्रिया दिली. डॉ.सुजय यांच्याऐवजी त्यांचे पिताश्री विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीच येऊन थेट निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

- Advertisement -

याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठक झाल्या आहेत. विजयादशमीपर्यंत सर्व चर्चा पूर्ण होईल, असे थोरातांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडून स्वतंत्र लढणार, या चर्चेवरआ. थोरात म्हणाले, महाविकास आघाडी पक्की असून सत्तेवर येणार असल्याचा ठाम विश्वास आहे. या चर्चा कुठून येतात माहीत नाही.

डॉ.जयश्रीच्या उमेदवारीचं अद्याप ठरलेलं नाही
आ. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात संगमनेरमधून विधानसभेच्या रिंगणात उतरणार याची चर्चा सुरु आहे. यावर त्यांनी पुन्हा एकदा गुगली टाकत याबद्दल अजून काही ठरलेले नाही, असे सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या