Thursday, December 12, 2024
Homeनगरसंगमनेरात घरफोडी, 'एवढ्या' रकमेची चोरी

संगमनेरात घरफोडी, ‘एवढ्या’ रकमेची चोरी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

अज्ञात चोरट्याने (Theft) घरामध्ये ठेवलेली 60 हजार रुपयांची रक्कम चोरून पलायन केल्याची घटना रविवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास पावबाकी रोड परिसरात घडली.

- Advertisement -

अकोले, राहुरी, नगर आणि कर्जतमध्ये दूध प्रकल्पांची तपासणी

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, पावबाकी रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिर जवळ राहणार्‍या नानासाहेब सोपान दिघे यांच्या घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरामध्ये ठेवलेली 60 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन (Money Theft) नेली.

गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – आ. तनपुरे

याबाबत नानासाहेब दिघे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 779/2023 भारतीय दंड संहिता कलम 457, 380 अन्वये दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहे. संगमनेर (Sangamner) शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चोर्‍या (Theft) होत असताना या चोरट्यांना पकडण्यात पोलीस (Police) प्रशासनाला अपयश येत आहे.

कोतूळमध्ये एकाच व्यासपीठावर दोन ग्रामसभा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या