Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेर बस स्थानकावर प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी

संगमनेर बस स्थानकावर प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर बस स्थानकावर बसमधून उतरत असताना एका महिलेल्या पर्समधून 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. गायत्री सागर पारखे (रा. कुरणपूर, ता. श्रीरामपूर) या पारनेर-नाशिक बसने संगमनेर येथे आल्या.

- Advertisement -

बसस्थानकावर बसमधून उतरत असताना त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे गंठण, सोन्याची ठुशी, सोन्याचे कानातले, व चांदीची साखळी असा एकूण 62 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. याबाबत गायत्री पारखे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या