Thursday, March 13, 2025
Homeनगरसरत्या वर्षात संगमनेर शहर गंभीर गुन्ह्यांनी गाजले

सरत्या वर्षात संगमनेर शहर गंभीर गुन्ह्यांनी गाजले

काही गुन्हे उघड करण्यात पोलिसांना आले यश

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

सरत्या वर्षात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 987 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 706 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, हाणामारी, गंठण चोरी, दुचाकी, घरफोडी आणि गोमांस रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचे अधोरेखीत होत आहे. नवीन वर्षात पोलीस यावर नेमका कसा वचक ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्याची वेगळी ओळख आहे. मोठे कार्यक्षेत्र असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच विविध घटना घडत असतात. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, अत्याचार, अपघात, गोमांस अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

पोलिसांनी काही गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींना गजाआड केले. यातील चार दाखल खुनाच्या गुन्ह्यांपैकी तीन उघड झाले आहेत. तसेच पाच अत्याचाराचे गुन्हेही उघड करण्यात यश आले. परंतु, 210 चोरीच्या गुन्ह्यांपैकी अवघे 17 गुन्हे उघड करता आले आहे. यामधील घरफोडी, गंठण चोरीसह इतरही मोठ्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षात खून, अत्याचार या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. वास्तविक पाहता शहर पोलिसांना गुन्हेगारांवर म्हणावा तसा वचक निर्माण करता आलेला नाही. याकाळात अधिकार्‍यांच्या बदल्याही झाल्या. परंतु, अपेक्षित असे यश मिळालेले नाही. वारंवार कारवाया करूनही शहरातील बेकायदेशीरपणे सुरू असणारे कत्तलखाने नेहमीच डोकेदुखी ठरत आहेत. यामुळे नववर्षात शहर पोलिसांना एक रोडमॅप तयार करुन पोलिसी खात्याचा वचक निर्माण करावा लागणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...