Thursday, September 10, 2026
Homeनगरसंगमनेरात माजी सरपंचावर गोळीबार; तालुका पोलिसांत सहा जणांवर गुन्हा दाखल

संगमनेरात माजी सरपंचावर गोळीबार; तालुका पोलिसांत सहा जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)

तालुक्यातील मालुंजे येथे मुरुम वाहतुकीच्या वादावरुन कुरापत काढून माजी सरपंचावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मालुंजे येथील गोसवी फाटा परिसरात माजी सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे (वय ४३) यांचे निवासस्थान आहे. मुरुम वाहतुकीच्या वादातून कुरापत काढून दोन दुचाकी वाहनांवरुन आलेल्या आरोपपिकी विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डिग्रस) या दोघांनी पिस्तुला-तून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. तर सुदर्शन शिवाजी श्रीराम व इतर तीन अनोळखी आरोपींनी घुगे यांच्या राहत्या घराचा दरवाजा व खिडकीवर तलवारीने मारुन तोडफोड केली आणि मोठमोठ्याने आरडा-ओरड करीत शिवीगाळ, दमदाटी करून निघून गेले.

याप्रकरणी संदीप घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल खेमनर, प्रवीण पुणेकर, सुदर्शन श्रीराम यांच्यासह अनोळखी तिघांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे करत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे आदिंसह पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून पुन्हा प्रादेशिक वादाची ठिगणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून नगर आणि पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी आपली आक्रमक आणि ठाम भूमिका स्पष्ट केली...