Saturday, March 15, 2025
Homeनगरपोलीस अधिकार्‍याने महसूल अधिकार्‍याची भूमिका बजावत अतिक्रमण हटविले

पोलीस अधिकार्‍याने महसूल अधिकार्‍याची भूमिका बजावत अतिक्रमण हटविले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

एखाद्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा अधिकार व जबाबदारी महसूल अधिकार्‍यांची असताना हे काम चक्क एका पोलीस अधिकार्‍याने पोलीस बळाचा वापर करून केले असल्याने हा शहर व तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisement -

संगमनेर शहरालगतच्या एका गावामध्ये एका जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते. संबंधित जमीन मालकाने हे अतिक्रमण हटविण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र त्याला या कामात यश आले नाही. याबाबत त्याने महसूल अधिकार्‍यांना वारंवार सांगितले होते. मात्र, एकाही महसूल अधिकार्‍याने हे अतिक्रमण हटविले नाही. यानंतर या इसमाने थेट पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन हे अतिक्रमण हटविण्याची विनंती केली. संबंधित पोलीस अधिकार्‍याने महसूल अधिकार्‍यांना विश्वासात न घेता पोलीस बळाच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटविले.

अतिक्रमण हटविलेली जागा कायदेशीर वादामध्ये आहे. पोलीस अधिकार्‍याने या जागेवरील अतिक्रमण हटवताना कागदपत्रांची शहानिशा केली आहे का? न्यायप्रविष्ट वाद असतानाही अतिक्रमण हटवले कसे? या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे.

पोलीस अधिकार्‍याने हे काम बेकायदेशीररित्या केल्याने पोलीस वर्तुळात तो चर्चेचा विषय बनलेला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली असून संबंधित पोलीस अधिकार्‍याला याबाबत लवकरच विचारणा होण्याची शक्यता आहे. हा अधिकारी काही दिवस रजेवर होता. यामुळे या अधिकार्‍याला वरिष्ठांनी सक्तीच्या रजेवर तर पाठवले नव्हते ना? अशी चर्चा होऊ लागली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

0
पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली....