संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची जिल्हाभरातील अवैध धंद्यांवर वक्रदृष्टी पडली असून, त्यांच्या विशेष पथकाने कारवायांचा सिलसिला सुरू केल्याने अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे. संगमनेरमध्येही शुक्रवारी (दि.20) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यांवर छापेमारी करत 10 लाख 46 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तब्बल 35 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की विशेष पथकातील पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शुक्रवारी पहिली कारवाई शहरातील तेलीखुंट परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत सुरू असलेल्या मटका पेढीवर केली. येथे तब्बल 29 जण मटका खेळताना व खेळविताना आढळून आले. या कारवाईत 74 हजार 650 रुपये रोख रक्कम, 4 लाख 35 हजार रुपयांच्या मोटारसायकली, 2 लाख 26 हजार रुपयांचे 22 मोबाईल असा एकूण 7 लाख 35 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोकॉ. आत्माराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शंकर भागप्पा इटप (वय 52), दत्तात्रेय भागप्पा इटप (वय 69, दोघेही रा. तेलीखुंट), नानासाहेब बापू जाधव (वय 46, रा. रायते), सूरज रामसिंग ताम्रकर (वय 34, रा. पम्पिंग स्टेशन), अण्णासाहेब कुंडलिक खताळ (वय 56, रा. धांदरफळ), रवींद्र नंदराम फासे (वय 50, रा. माळवाडी), हौशीराम रामभाऊ कहांडळ (वय 55, रा. सावरचोळ), इक्बाल बशीर शेख (वय 65, रा. गवंडीपुरा), शेखर भास्कर जाधव (वय 35, रा. घुलेवाडी), नानासाहेब भीमराज उकिर्डे (वय 60, रा. निळवंडे), रामदास गणपत माळी (वय 45, रा. रायते), कैलास बाबुराव जाधव (वय 50, रा. खांडगाव), शिवाजी दत्तू सातपुते (वय 40, रा. कुरण रोड), राजू रामनाथ झांबरे (वय 52, रा. उपासनी गल्ली), मधुकर नामदेव भोर (वय 45, रा. घुलेवाडी), बाळासाहेब कारभारी पवार (वय 50, रा. ओझर), भाऊसाहेब नाना काळे (वय 50, रा. आनंदवाडी), शंकर संजय सवारगे (वय 65, रा. वैदुवाडी), रमेश बाबुराव सरोदे (वय 74, रा. देवीगल्ली), दगडू रामचंद्र पवार (वय 62, रा. कनोली), दत्तू तुकाराम अनाप (वय 60, रा. कासारा दुमाला), अस्लम सुलतान शेख (वय 35, रा. समनापूर), हरिभाऊ बबन पवार (वय 47, रा. निळवंडे), मनोहर काशिनाथ अभंग (वय 74, रा. माताडे मळा), संभाजी किसन साळवे (वय 62, रा. निमगावजाळी), सुदर्शन दत्तात्रेय इटप (वय 42, रा. तेलीखुंट), सोमनाथ शिवदास यादव (वय 40, रा. कौठे कमळेश्वर), विश्वनाथ नाना आल्हाट (वय 70, रा. पम्पिंग स्टेशन) व सुभाष सीताराम खैरे (वय 55, रा. जोर्वे) अशा 29 जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे तपास करत आहे.
तर दुसरी कारवाई साडेसहा वाजेच्या सुमारास कोल्हेवाडी रोड परिसरात केली. येथेही मटका खेळताना व खेळविताना सहाजण मिळून आले. या कारवाईत 53 हजार 660 रुपये रोख रक्कम, 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे 8 मोबाइल आणि 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी असा एकूण 3 लाख 10 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. संतोष बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी सय्यद अश्रफ समशेर अली (वय 46), नावेद अश्रफ सय्यद (वय 23, दोघेही रा. तीनबत्ती चौक), आयन साजिद सय्यद (वय 27, रा. कोल्हेवाडी रोड), सय्यद नजाकत समशेर अली (वय 42, रा. तीनबत्ती चौक), हुसनेन रौफ पटेल (वय 26, रा. अलकानगर) व रियाज बापूमिया देशमुख (वय 50, रा. तीनबत्ती चौक) अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभंग हे करत आहे.




