Monday, May 27, 2024
Homeनगरसंगमनेरात चोरट्याने लांबविली अडीच लाखांची रक्कम

संगमनेरात चोरट्याने लांबविली अडीच लाखांची रक्कम

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

अज्ञात चोरट्याने (unknown thief) 2 लाख 60 हजार रुपये चोरल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) बँक ऑफ इंडिया (Bank OF India) समोर घडली.

- Advertisement -

संजय भाऊसाहेब शेजुळ (रा. ओझर खुर्द तालुका संगमनेर) यांनी आपला ट्रॅक्टर थोरात सहकारी साखर कारखान्यामध्ये (Thorat Co-operative Sugar Factories) ऊस वाहतुकीसाठी एका ठेकेदाराला (Contractor) भाडेतत्वावर दिलेला आहे. या ठेकेदाराने (Contractor) त्यांना सोमवारी दुपारी दोन लाख 60 हजार रुपयांची रक्कम घुलेवाडी (Ghule) येथे दिली. शेजुळ हे ही रक्कम भरण्यासाठी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहरातील बँक ऑफ इंडिया (Bank Of India) येथे आले.

ही रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली होती. उशीर झाल्याने रक्कम भरता येईल का? अशी चौकशी करण्यासाठी ते बँकेत गेले अज्ञात चोरट्याने याचा फायदा घेत डिक्कीतून रक्कम लांबवून एका जोडीदाराच्या दुचाकीवर बसून पलायन केले. याबाबत संजय शेजुळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या