Tuesday, March 25, 2025
HomeनगरSangamner : संगमनेर पालिकेच्या कचरा डेपोला लागली आग

Sangamner : संगमनेर पालिकेच्या कचरा डेपोला लागली आग

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर खुर्द येथील पालिकेच्या कचरा डेपोला (Garbage Depo) गुरुवारी (दि.20) सायंकाळी भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ निघत होते. तर धुरामुळे आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

- Advertisement -

शहरातील कचरा पालिका घंटागाड्यांद्वारे मोठ्या प्रमाणात गोळा करुन येथील कचरा डेपोत (Garbage Depo) आणून टाकतात. येथे या कचर्‍यावर प्रक्रिया देखील केली जाते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डेपोला अचानक भीषण आग (Fire) लागली. यावेळी आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात निघत होते. तर संपूर्ण धूर परिसरात पसरला होता. यामुळे येथून ये-जा करणार्‍या प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. याचबरोबर आजूबाजूच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या घटनेची माहिती समजताच पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आग (Fire) विझविण्यासाठी प्रयत्न केले. तत्काळ अग्निशमन बंबास (Fire Brigade) पाचारण करण्यात आले होते. आगीची तीव्रता जास्त असल्याने रात्री साडेआठ वाजेपर्यंत आग (Fire) विझविण्याचे काम सुरू होते. यापूर्वी देखील या कचरा डेपोला आग (Garbage Depo Fire) लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या डेपोमुळे सातत्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेकदा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...