Tuesday, December 10, 2024
Homeनगरपोलीस उपनिरीक्षकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडले

पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

फटाक्याचा स्टॉल (Fire Cracker Stall) लावण्याचा परवाना देण्यासाठी आठशे रुपयांची लाच (Bribe) घेताना संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बाळासाहेब यादव (Sangamner Police Station PSI) यांना लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी झाली. लाचलुचपत विभागाचे (Bribery Section) पोलीस उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यास ताब्यात घेण्यात आले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

- Advertisement -

नगर-नाशिकच्या धरणांतून 8.6 टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडणार

याबाबत समजलेली माहिती अशी की, दिवाळीनिमित्त फटाक्याचे स्टॅल लावण्यासाठी परवानगी घेण्यासाठी शहरातील एक व्यावसायिक संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner Police Station) गेला होता. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव याने परवाना देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर आठशे रुपये देणे ठरले. पोलीस उपनिरीक्षक यादव यांच्या त्रासाला कंटाळलेल्या तक्रारदाराने थेट नगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क केला.

डॉक्टरला बांधले, 40 लाख रुपये लुटले

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपाधिक्षक प्रविणकुमार लोखंडे यांनी त्यांचे पथक संगमनेरला (Sangamner) पाठविले. लाचलुचपत खात्याचा पथकाने सापळा रचून बाळासाहेब यादव याला आठशे रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत खात्याने कारवाई सुरू केल्याने अनेक पोलीस कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांना वर्षभरापूर्वीच पीएसआय म्हणून बढती मिळाली होती.

मराठा आरक्षणासाठी अजून एक बळी! संगमनेरात चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
राहाता बाजार समितीत कांद्याची ‘एवढी’ आवक; वाचा भाव

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या