Tuesday, March 25, 2025
Homeनगरधांदरफळ सभेनंतरची तोडफोड, जाळपोळ पूर्वनियोजित

धांदरफळ सभेनंतरची तोडफोड, जाळपोळ पूर्वनियोजित

डॉॅ.सुजय विखे यांचा लोणीतील निषेध सभेत थोरात समर्थकांना इशारा

राहाता |प्रतिनिधी| Rahata

धांदरफळ सभा संपल्यानंतर थोरात समर्थकांनी महिला आणि कार्यकर्त्यांच्या गाड्या नियोजनबध्द पध्दतीने आडवून तोडफोड केली. गाड्या जाळण्यासाठीचे साहित्य त्यांच्याकडे आधीच होते. या सर्व गोष्टी अचानक होवू शकत नाही. त्यामुळेच हे ठरवून केलेले षडयंत्र असल्याचा आरोप डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला. ही संगमनेरची दहशती संस्कृती राहाता तालुक्यातील जनता सहन करणार नाही. तुम्हालाही जशास तसे उत्तर देण्याची तयारी आमची आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीच्या निषेधासाठी लोणीत सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तातडीने निषेध केला. त्या वक्तव्याचे समर्थनही होवू शकत नाही. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, हीच माझी भूमिका आहे. मात्र या घटनेच्या आडून आमच्या अंगावर येण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर आम्हीही सहन करणार नाही. तालुक्यात सभांना मिळणार्‍या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिशय तयारीने माझ्यावरच हल्ल्याचा कट केला होता.

सभा सुरु असतानाच याची माहिती मला मिळाली. त्यामुळे त्या ठिकाणी अधिक उद्रेक होवू नये म्हणून मी कार्यकर्त्यांसह तेथून बाहेर पडलो. हल्लापिडीत सर्व कार्यकर्त्यांना आपण दिलासा दिला असून संगमनेर तालुक्यातील दहशत संपविण्यासाठी आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.

लोणी येथे रास्तारोको
डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला करण्याच्या कटकारस्थान असल्याचा उल्लेख करून उपस्थित कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. लोणी बुद्रूक येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन कालच्या घटनेविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.

आयोगाला निवेदन
गाड्यांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले करणार्‍यांवर आधीच कारवाई होण्याची गरज होती. मात्र याचे गांभीर्य प्रशासनाने दाखविले नाही. नाईलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे. कालच्या घटनेची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी. आयोगाकडे याचे सविस्तर निवेदन देणार असल्याची माहीती डॉ.सुजय विखे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...