Saturday, May 4, 2024
Homeनगरसंगमनेरात विद्यार्थिनीची छेडछाड

संगमनेरात विद्यार्थिनीची छेडछाड

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

मैत्रिणी सोबत भाजीपाला आणण्यासाठी पायी जाणार्‍या एका विद्यार्थिनीची अज्ञात इसमाने छेडछाड केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अकोले बायपास जवळ घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मूळची अकोले तालुक्यातील लिंगदेव परिसरात राहणारी व सध्या शिक्षणासाठी संगमनेर येथे राहत असलेली अठरा वर्षांची युवती शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसोबत भाजीपाला आणण्यासाठी जात होती. ऐश्वर्या पेट्रोलपंपामागे मोटार सायकलवरून एक जण तेथे आला.

- Advertisement -

त्याने सदर युवतीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तो लगेच घटनास्थळावरून निघून गेला. याबाबत सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. खाडे करत आहेत. संगमनेर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयीन युवतींची छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने हे प्रमाण वाढत आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या