Wednesday, April 2, 2025
Homeनगरसंगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने उडवली दाणादाण

संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने उडवली दाणादाण

वीज पडून दोन गाई दगावल्या

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील सावरगाव तळ (Savargav Tal) येथे बुधवारी (दि.2) दुपारी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावल्याने दाणादण उडाली. यामध्ये गहू (Wheat), कांदा (Onion), हरभरा, उन्हाळी बाजरीसह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई (Cow Death) दगावल्या आहेत. यामुळे शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे.

- Advertisement -

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सांगितल्याने शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली होती. मंगळवारी तुरळक पाऊस देखील पडला. मात्र बुधवारी दुपारी सावरगाव तळ परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जवळपास दोन ते अडीच तास चांगलीच हजेरी लावली. यामुळे शेतांमधून अक्षरशः पाणी वाहत होते. तर ओढे-नाले देखील वाहू लागले होते. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. यामध्ये हातातोंडाशी आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या गोठ्यावर वीज पडून (Lightning Strikes) दोन गाई दगावल्या आहेत.

नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करा – आ. खताळ
संगमनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकार्‍यांना दिले आहेत. तर आज नुकसानग्रस्त गावांचा दौरा आमदार खताळ हे स्वतः करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime News : मुलीवर अत्याचार करणार्‍यास आजन्म कारावास

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori नातेसंबधांचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape) करुन पीडिता गरोदर राहून प्रसुत झाल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा...