संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
शहरातून जाणार्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या एक्स्पो समोर रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, पोलिसांनी इन्कार केल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. सध्या एक्स्पो सुरू झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोमवारी देखील मोठ्या संख्येने लोक येथे आलेले होते.
दरम्यान, रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन शिवीगाळ केल्याने हा वाद टोकाला गेला. तेवढ्यात एका गटातील तरुणाने गावठी कट्टा काढून रस्त्यावर गोळीबार केला. त्यामुळे लोक पळू लागले. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संबंधित तरुणाने गावठी बंदूक नव्हे तर लाईटर काढले होते. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो पसार झाला. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावले. काही तरुणांनाही चौकशीसाठी बोलावले. संबंधित तरुणाला लवकरच ताब्यात घेण्यात येईल.
– रवींद्र देशमुख (पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर)