संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तालुकानिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्यात आली असून यावर हरकतींसाठी जिल्हाधिकारी यांनी 8 जूनपर्यंत मुदत दिली आहे. संगमनेर तालुक्यात या नव्या रचनेत एक गट व दोन गण वाढले आहेत.
संगमनेर तालुक्यात 2017 च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 9 व पंचायत समितीचे 18 गण होते. मतदार संख्या वाढली असल्याने जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 10 तर पंचायत समिती सदस्यांची संख्या 20 असणार आहे.
2017 च्या निवडणूकीत तळेगाव गट रद्द करुन वडगावपान गट निर्माण करण्यात आला होता. मात्र आता नव्याने गट-गणांच्या रचनेमध्ये तळेगाव गट निर्माण करण्यात आला असून वडगावपान रद्द करण्यात आला आहे. संगमनेर खुर्द गटामध्ये असलेली वडगावपान, जोर्वे गटातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.
चंदनापुरी हे गाव संगमनेर खुर्द गटात होते. मात्र आता नव्याने तयार झालेल्या चंदनापुरी गटामध्ये पठारभागातील पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर, डोळासणे, कर्जुलेपठार, पिंपळगाव माथा व इतर छोट्या वाड्यांचा समावेश झाला आहे.
पोखरी हवेली हे वडगावपान गटात होते ते आता तळेगाव गटात गेले आहे. वडगावपान गट होता आता तो गण झाला आहे. घुलेवाडी गटातील गुंजाळवाडी गणातील कासारादुमाला काढून ते धांदरफळ बुद्रूक गटातील राजापूर गणात गेले आहे.
साकूर गटात पिंपळगाव देपा गण होता त्याऐवजी वरवंडी गणाची निर्मिती झाली आहे. बोटा गटात सावरगाव घुले गण होता त्याऐवजी खंदरमाळवाडी गण झाला आहे. जोर्वे गटातील कोल्हेवाडी हे संगमनेर खुर्द गटात गेले आहे. कोळवाडे हे संगमनेर खुर्द गणात होते ते आता अंभोरे गणात गेले तर जाखुरी हे जोर्वे गणात गेले आहे. रायतेवाडी, निमगाव टेंभी, शिरापुर हे संगमनेर खुर्द गणात होते ते आता वडगावपान गणात आले. जोर्वे गणातील निंबाळे, रायते, देवगाव हे वडगावपान गणात आले आहे. नव्याने गट-गण रचनेमुळे इच्छुक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
संगमनेर तालुक्यातील गट व गणांची रचना
1) समनापूर गट (15 गावे) :
निमोण गण- (9 ग्रामपंचायती) निमोण, नान्नज दुमाला, पारेगाव बुद्रूक, पळसखेडे, पिंपळे, कर्हे, सोनेवाडी, पारेगाव खुर्द, सोनोशी
समनापूर गण- (6 ग्रामपंचायत) समनापूर, सुकेवाडी, कुरण, मालदाड, पोखरी हवेली, खांजापूर,
2) तळेगाव गट (17 ग्रामपंचायती, 6 गावे) :
तळेगाव गण- (9 ग्रामपंचायती) तळेगाव व आरामपूर, अजमपूर, जुनेगाव, हसनाबाद, चिंचोली गुरव, लोहारे, कासारे, देवकौठे, वडझरी बुद्रूक, काकडवाडी, वडझरी खुर्द, तिगाव,
कोकणगाव गण- (8 ग्रामपंचायती, 2 गावे) कोकणगाव, मनोली, कौठे कमळेश्वर, निळवंडे, मेंढवण, मिरपूर, कोंची, करुले, शिवापूर, मांची.
3) आश्वी बुद्रूक गट (13 ग्रामपंचायती, 2 गावे) :
आश्वी बुद्रूक गण – (6 ग्रामपंचायती) आश्वी बुद्रूक, निमगावजाळी, चिंचपूर बुद्रूक, उंबरी, सादतपुर, औरंगपूर,
आश्वी खुर्द गण – (7 ग्रामपंचायती) आश्वी खुर्द, पिंप्री लौकी अजमपूर, खळी, दाढ खुर्द, चणेगाव, झरेकाठी, प्रतापपूर,
4) जोर्वे गट (16 ग्रामपंचायती) :
जोर्वे गण – (8 ग्रामपंचायती) जोर्वे, पिंपरणे, कनोली, रहिमपूर, जाखुरी, खराडी, ओझर खुर्द, कनकापूर,
अंभोरे गण – (8 ग्रामपंचायती) अंभोरे, पानोडी, शिबलापूर, कोळवाडे, शेडगाव, मालुंजे, ओझर बुद्रूक, हंगेवाडी.
5) संगमनेर खुर्द गट (15 ग्रामपंचायती, एक वाडी) :
वडगावपान गण – (10 ग्रामपंचायती) वडगावपान, कोल्हेवाडी, रायतेवाडी, देवगाव, रायते, वाघापूर, माळेगाव हवेली, निंभाळे, निमगाव टेंभी, शिरापूर,
संगमनेर खुर्द गण – (5 ग्रामपंचायती) संगमनेर खुर्द, वैदुवाडी, निमज, हिवरगावपावसा, खाडंगाव, झोळे,
6) घुलेवाडी गट (4 ग्रामपंचायती, 1 गाव) :
घुलेवाडी गण – (1 ग्रामपंचायत) घुलेवाडी,
गुंजाळवाडी गण – (3 ग्रामपंचायत, एक गाव) गुंजाळवाडी, ढोलेवाडी, वेल्हाळे, सायखिंडी.
7) धांदरफळ बुद्रूक गट (12 गावे, एक वाडी) :
राजापूर गण – (5 ग्रामपंचायत) राजापूर, जवळेकडलग, कासारा दुमाला, चिकणी, निमगाव भोजापूर.
धांदरफळ बुद्रूक गण – (7 ग्रामपंचायती, एक वाडी) धांदरफळ बुद्रूक, वडगाव लांडगा, चिखली, पिंपळगाव कोंझिरा, कोकणेवाडी, मंगळापूर, कौठे धांदरफळ, सांगवी,
8) चंदनापुरी गट (15 ग्रामपंचायत, सहा वाड्या, एक गाव) :
चंदनापुरी गण – (7 ग्रामपंचायत, 4 वाड्या, एक गाव) चंदनापुरी, गाभणवाडी, पिपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी, सावरगाव तळ, डोळासणे, बांबळेवाडी, पोखरी बाळेश्वर, कर्जुलेपठार, गुंजाळवाडीपठार, पिंपळगावमाथा
पेमगिरी गण – (8 ग्रामपंचायत, दोन वाड्या) पेमगिरी, निमगाव बुद्रूक, नांदुरी दुमाला, धादंरफळ खुर्द, सावरचोळ, मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, मिर्झापूर, शिरसगाव, धुपे,
9) साकुर गट (16 ग्रामपंचायत, 3 वाड्या, एक गाव) :
वरवंडी गण – (9 ग्रामपंचायत, दोन वाड्या) वरवंडी, कुंभारवाडी, चौधरवाडी, मांडवे बुद्रूक, खांबे, डिग्रस, शिंदोडी, खरशिंदे, रणखांबवाडी, कौठेमलकापूर, दरेवाडी,
साकुर गण – (7 ग्रामपंचायत, एक गाव) साकुर, जांभूळवाडी, नादूरखंदरमाळ, जांबुत बुद्रूक, जांबुत खुर्द, हिवरगावर पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी,
10) बोटा गट (20 ग्रामपंचायत, 8 वाड्या) :
खंदरमाळवाडी गण – (12 ग्रामपंचायत, दोन वाड्या) खंदरमाळवाडी, आंबी खालसा, कौठे बुद्रूक, सारोळेपठार, जवळेबाळेश्वर, कौठेवाडी, सावरगाव घुले, वनकुटे, कौठे खुर्द, खांडगेदरा, वरुडी पठार, माळेगाव पठार, बोरबनवाडी, महालवाडी,
बोटा गण – (6 ग्रामपंचायत, एक वाडी)
घारगाव, आंबी दुमाला, भोजदरी, पेमरेवाडी, कुरकूटवाडी, कुरकूंडी, म्हसवंडी