Monday, June 24, 2024
Homeनगरसांगवी भुसारमध्ये तोंडावर विषारी स्प्रे मारून एकास मारहाण

सांगवी भुसारमध्ये तोंडावर विषारी स्प्रे मारून एकास मारहाण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

घरातील सदस्यांना शिवीगाळ का केली? असा जाब विचारण्यास गेलेल्या इसमाच्या तोंडावर विषारी स्प्रे मारून लाकडी दांडके व फावड्याने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत दोन आरोपींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दादा साखराम मेहरखांब यांचा मुलगा प्रशांत दादासाहेब मेहरखांब हा गावातील सोमनाथ छगन वाहुळ यांच्या घरासमोरून गेला. त्याने सोमनाथ वाहुळ यास तू माझ्या लहान भावास व माझ्या वयोवृद्ध आई-वडिलांना आणि माझ्या पत्नीस शिवीगाळ का केली? असे विचारले. याचा राग आल्याने आरोपी सोमनाथ छगन वाहुळ, अमोल छगन वाहुळ यांनी वाईट वाईट शिवीगाळ करून त्यांच्या हातातील लाकडी दांडा व फावडे याने मारहाण करून प्रशांत मेहरखांब व पुंडलिक मेहरखांब, दत्तात्रय मेहेरखांब यांच्या तोंडावर काहीतरी विषारी स्प्रे मारला व लाथाबुक्क्याने मारहाण केली.

आमच्या नादी लागला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत दादा सखाराम मेहरखांब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुरनं, 438/2023 भादंवि कलम 326, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.डी बोटे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या