Saturday, May 4, 2024
Homeनगरसंगमनेरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

संगमनेरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

राज्यात गुटखा विक्री व वाहतूकीस बंदी असतांना संगमनेर शहर व परिसरात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

- Advertisement -

काल विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई करुन सुमारे एक लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बाजारपेठेतील तांबोळी ट्रेडर्स या दुकानावर पोलिसांनी कारवाई केली. या दुकानातून 9 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. राजू उर्फ मुज्जफर पापाभाई तांबोळी (रा. कोल्हेवाडी रोड) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

दुसरी कारवाई शहरातील नायकवाडपुरा येथे करण्यात आली. या ठिकाणाहून 3 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या परिसरातील रुबी बिल्डींगमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रफिक शेख याच्या विरुध्द कारवाई करण्यात आली. हा फरार झाला आहे. ही कारवाई काल रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

तिसरी कारवाई मारुती लॉन्स परिसरात करण्यात आली. अभिजित पगडाल (रा. पदमानगर) याच्याकडून 87 हजार 850 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तिन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार गायकवाड हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या