Tuesday, April 1, 2025
Homeनगरसंगमनेरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन

संगमनेरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याबद्दल तसेच ‘रेप इन इंडिया’ या राहुल गांधी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा संगमनेर भाजप युवा मोर्चाच्यावतीने जोडे मार आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या वतीने काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथे झालेल्या सभेत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले. सावरकर यांच्याबद्दल समस्त राष्ट्रप्रेमी भारतीयांना आदर आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी सुध्दा त्यांच्याबद्दल अनेकवेळा गौरवोद्गार काढले आहेत.

- Advertisement -

अशा महान देशभक्त नेत्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणे म्हणजे कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा अपमान आहे. राहुल गांधी हे चिथावणीखोर भाषा वापरत आहे. त्यांच्यावर देशद्रोह अथवा तत्सम गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना माजी नगरसेविका ज्योती भोर, नगरसेविका मेघा भगत, कांचनताई ढोरे, रेश्मा खांडरे, हेमलता तारे, वैशाली तारे, ललिता मालुसरे, मनीषा पंधारे, यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, ज्ञानेश्‍वर कर्पे, शिरीष मुळे, भरत फटांगरे, तालुका सरचिटणीस वाल्मीक शिंदे, दिनेश सोमाणी, योगराज परदेशी, दीपेश ताटकर, कल्पेश पोेगूर, विकास गुळवे, पप्पू माळी, दीपक भगत, भारत गवळी, दिलीप रावल, किशोर गुप्ता, शिवकुमार भांगिरे, मनोज जुंदरे, दादासाहेब नेहे, अमोल रणाते, जग्गू शिंदे, बाबासाहेब इंगळे, शरद मोरे, शैलेश फटांगरे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी बेकायदेशीर एकत्र जमून मोेर्चा काढून राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करुन जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केलेल्या मुंबई पोलीस अधिनियम 37 (1), (3)/135 जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने सहायक फौजदार बाळासाहेब पारधी यांनी आंदोलनकर्त्यांविरोधात फिर्याद दिली.

त्यानुसार काशीनाथ पावसे, रामचंद्र जाजू, मनोज जुंदरे, वैशाली तारे, हेमलता तारे, मेघा भगत, ज्योती भोर, ललिता मालुसरे, दीपक भगत, भारत गवळी, मनिषा पंधारे, दिनेश सोमाणी, दिलीप रावळ, अमोल रणाते, विकास गुळवे, संपत देठे, शिवकुमार भांगिरे, शिरीष मुळे, योगराजसिंह परदेशी, कल्पेश पोेगूल, विनायक थोरात, दीपेश ताटकर, जगन्नाथ शिंदे, बाबासाहेब इंगळे, ज्ञानेश्‍वर सुखदेव माळी, ज्ञानेश्‍वर कर्पे, अशोेक शिंदे, शैलेष फटांगरे, सचिन शिंदे, शरद अशोेक मोरे, राजेंद्र श्रीराम सांगळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोेलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवडे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...