Saturday, May 4, 2024
Homeनगरसंगमनेर महाविद्यालयास पुणे विद्यापीठाची 25 लाखांची शिष्यवृत्ती मंजूर

संगमनेर महाविद्यालयास पुणे विद्यापीठाची 25 लाखांची शिष्यवृत्ती मंजूर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत मेरिट शिष्यवृत्तींच्या माध्यमातून

- Advertisement -

संगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना जवळपास 25 लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली आहे.

यामध्ये सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना, राजर्षी शाहु महाराज अर्थसहाय्य योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्नित पुणे-नगर-नाशिक जिल्ह्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करत असते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी विद्यापीठाप्रती आभार व्यक्त करून ते म्हणाले की, विद्यापीठाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंजूर केलेली शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान असून उच्चशिक्षणाची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचे महत्त्व खूप मोलाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदैव गुणवत्तेचा ध्यास घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अशाप्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करून मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती मंजूर करणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिष्यवृत्ती विभागातील विजय पाटील व सोपान मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शै.वर्ष 2020-21 पासून संगमनेर महाविद्यालयाच्या www.sangamnercollege.edu.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीबाबत स्वतंत्र ट्युब तयार केले असून, त्यासोबत sangamner college Telegram Channel वर विविध शिष्यवृत्तींबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे,असे आवाहन प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले आहे.

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र लढ्ढा, डॉ. रवींद्र तासिलदार, सर्व प्राध्यापक, प्रबंधक संतोष फापाळे, साहेबराव तुपसुंदर आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या