संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner
तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढतच असून काल नव्याने 16 करोना बाधित आढळून आले आहे. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 223 झाली आहे. काल जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात 10 तर 6 अहवाल खासगी लॅबचे प्राप्त झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
शहरातील पंजाबी कॉलनी 63 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, खांडगाव येथील 18 वर्षीय तरुण, नान्नज येथील 46 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष, संगमनेरातील नवघर गल्ली येथील 60 वर्षीय पुरुष, चिखली येथील 38 वर्षीय महिला, खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गुंजाळवाडी विठ्ठल नगर येथील 40 वर्षीय पुरुष, घुलेवाडी-समनापूर रोडवरील 36 वर्षीय पुरुष, निमोण येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, मालदाडरोड भारतनगर येथील 52 वर्षीय पुरुष, एकता चौक येथील 49 वर्षीय पुरुष असे 16 व्यक्तींचे करोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत.