Saturday, May 4, 2024
Homeनगरसंगमनेरात बेकायदेशीर गुटखा विक्री पुन्हा जोमात

संगमनेरात बेकायदेशीर गुटखा विक्री पुन्हा जोमात

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

राज्यात गुटखा विक्री व साठा करण्याला बंदी असतानाही संगमनेर शहरात मात्र दोन दिवसांपासून पुन्हा खुलेआम गुटखा विक्री सुरू झाली आहे. 9 होलसेल विक्रेते व 30 फेरीवाले यांना गुटखा विक्रीसाठी तब्बल तिप्पट रक्कम संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना द्यावी लागणार असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. या व्यवसायात पोटी संबंधित अधिकार्‍यांना महिन्याला सुमारे चार लाख रुपयांची कामाई होणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

राज्यात गुटखा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. संगमनेर शहरात मात्र ही बंदी झुगारून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होत होती. गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुटखाविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. गुटखा विक्रीला परवानगी द्यावी यासाठी संबंधित गुटखा विक्रेत्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला यशही आले असून दोन दिवसापासून शहरांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू झाली आहे. संगमनेर शहरात 9 होलसेल विक्रेते असून 30 फेरीवाले आहे. त्यांच्या माध्यमातून शहर व तालुक्यात गुटखा विक्री सुरू आहे. या गुटखा विक्रेत्यांना यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

मागील वर्षी या काळात होलसेल विक्रेत्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागायचे तर फेरीवाल्यांना 2000 रुपये द्यावे लागायचे. यामध्ये आता बदल करण्यात आला असून होलसेल विक्रेत्यांना दहा ऐवजी पंचवीस हजार रुपये द्यावे लागणार आहे तर फेरीवाल्यांना 2 हजार रुपये ऐवजी 6 हजार रुपये मोजावे लागणार आहे. सर्व गुटखा विक्रेते मिळून संबंधित अधिकार्‍याला महिन्याला तब्बल चार लाख रुपये द्यावे लागणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

या बेकायदेशीर गुटखा विक्री मध्ये स्थानिक अधिकार्‍यांनी सोबतच एका वरिष्ठ अधिकार्‍यांचा ही हात आहे. गुटखा विक्रेत्याकडून दरमहा वसुलीसाठी एका कर्मचार्‍याची खास नियुक्ती करण्यात आली असून हा कर्मचारीही त्याचा लाभ करून घेताना दिसत आहे. शहरातील अवैध व्यवसाय बंद असल्याबाबत चर्चा करणार्‍या अधिकार्‍यांच्या कारकिर्दीत शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटखा विक्री सुरू झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संगमनेरातील गुटखा विक्रीकडे लक्ष घालून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या