Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमSangamner : भंडारे महाराजांवर घुलेवाडीत हल्ला, गाडीचीही तोडफोड

Sangamner : भंडारे महाराजांवर घुलेवाडीत हल्ला, गाडीचीही तोडफोड

संगमनेरात 14 जणांवर गुन्हा दाखल || हल्ल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील घुलेवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी (दि.16) रात्री दहा वाजेच्या सुमारास राजगुरुनगर येथील संग्रामबापू महाराज भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना अचानक चौघांनी महाराजांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जात हल्ला केला आणि जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निष्पन्न चौघांसह इतर 8 ते 10 जणांवर शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. घुलेवाडी सप्ताहामध्ये चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा संग्रामबापू महाराज भंडारे यांची होती.

- Advertisement -

शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास चालू कीर्तनात येथीलच नीलेश दगडू गायकवाड याने महाराजांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन हल्ला केला. तसेच सोबत असलेले अनिल बबन राऊत, वैभव दगडू गायकवाड व तुळशीराम रामचंद्र दिघे (सर्व रा. घुलेवाडी) हे देखील महाराजांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा इतरही 8 ते 10 जण होते. कीर्तन सेवेच यजमान असलेले स्वरुप गजानन राऊत यांनाही या सर्वांनी, ‘तुम्ही हरिनाम सप्ताह कसा करतात ते पाहतो’ अशी धमकी देत कीर्तन बंद पाडले. त्यानंतर महाराजांच्या गाडीचीही तोडफोड करुन नुकसान केले.

याबाबत कीर्तनाचे यजमान असलेले स्वरुप गजानन राऊत (वय 35, रा. घुलेवाडी) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वरील नीलेश गायकवाड, अनिल राऊत, वैभव गायकवाड, तुळशीराम दिघे या चौघांसह इतर 8 ते 10 जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे हे करत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...