Friday, November 22, 2024
HomeमनोरंजनMahadev Online Gaming App: संजय दत्त, सुनिल शेट्टी, रश्मिका मंदाना सोबत ३४...

Mahadev Online Gaming App: संजय दत्त, सुनिल शेट्टी, रश्मिका मंदाना सोबत ३४ कलाकार ईडीच्या रडारवर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

महादेव ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप (Mahadev Online Gaming App) प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. १८ सप्टेंबरला UAE मध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि पार्टीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांची नावे समोर आली असून त्यात सुनील शेट्टी, संजय दत्त, रश्मिका मंदाना (Suniel Shetty, Sanjay Dutt, Rashmika Mandana Names In List) यांच्यासह ३४ बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.

- Advertisement -

यूएईमध्ये झालेल्या पार्टीत एक युट्यूब इन्फ्लुएंसर सहभागी झाला होता. त्याने आपल्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आले. सौरभ चंद्राकर (Sudarshan Chandrakar)या आरोपीने त्याच्या लग्नासाठी २०० कोटी तर वाढदिवस आणि पार्टीसाठी ६० कोटी रुपये खर्च केल्याचे समजते आहे. या पार्टीमध्ये सहभागी झालेले कलाकारही दिसत आहेत.

दृष्टीहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी काय केले? हायकोर्टाचा आरबीआयला सवाल

दरम्यान, महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या सर्व कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे सौरभ चंद्राकरच्या लग्नाला हजेरी लावणारे आणि वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले आणि परफॉर्म करणारे सेलिब्रिटीच नाही तर महादेव बुक अ‍ॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणारे बॉलिवूड कलाकार आता ईडीच्या रडारवर आहेत.

हे आहेत कलाकार

१) दीप्ती साधवानी

२) रफ्तार

३) सोनू सुद

४) सुनील शेट्टी

५) संजय दत्त

महिलांच्या मानसिक आरोग्याची गंभीर दखल घेणे गरजेचे

६) हार्डी संधू

७) सुनील ग्रोव्हर

८)रश्मिका मंधाना

९)सोनाक्षी सिन्हा

१०)गुरु रंधावा

११) टायगर श्रॉफ

१२) सारा अली खान

१३) सुखविंदर सिंग

१४) कपिल शर्मा

१५) मलायका अरोरा

१६) डिजे चेतस

१७) नोरा फतेही

१८) नुसरत भरुचा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी ‘इतका’ कोटी निधी

१९) मौनी रॉय

२०) अमित त्रिवेदी

२१) सोफी चौधरी

२२) आफताब शिवदासानी

२३) डेझी शाह

२४) नर्गिस फाकरी

२५) उर्वशी रौतेला

२६) इशिता राज

२७) नेहा शर्मा

२८)स्नेहा उलाल

२९) प्रीती जांगियानी

३०)शमिता शेट्टी

३१) एलनाझ

३२) सोनाली सहगल

३३) इशिता दत्ता

३४) ज्योर्जिओ अँड्रियानी

काय आहे महादेव अ‍ॅप प्रकरण?

महादेव बुक अ‍ॅपचा मालक सौरभ चंद्राकरने UAE मध्ये झालेल्या त्याच्या लग्नात २०० कोटी रुपयांचा खर्च केला होता. २०० कोटी रुपये उधळल्यामुळे तो चर्चेत आलेला. ईडी आता या प्रकरणील मनी लाँडरींगचा तपास करत असून सौरभच्या लग्नाला UAE मध्ये जे बॉलीवूड जे अभिनेता, अभिनेत्री व गायक उपस्थित होते व त्याचबरोबर काही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांनी महादेव बुक अ‍ॅपचा प्रचार केला होते त्यांना चौकशीसाठी बोलवले जाणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या