Friday, November 8, 2024
Homeनगरमहाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांनी विष कालवले

महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांनी विष कालवले

संजय राऊत यांचा आरोप

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

महाराष्ट्रातील राजकारणात विष कालवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला. दरम्यान, त्यांनी यावेळी पक्षाशी गद्दारी करणार्‍यांवर पुन्हा तोफ डागली. श्रीगोंदा येथे ते बोलत होते. खा. राऊत म्हणाले, रिक्षा चालवायचा तो आता मुख्यमंत्री झाला. ही शिवसेना अशीच आहे. आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये ना कोणाचा कारखाना, ना शाळा, ना सूतगिरणी, ना डेअरी, ना दूध उत्पादक संघ, ना बँक. तरीसुद्धा आमचे 18 खासदार आहेत. 20-20 खासदार, 60-60 आमदार निवडून येतात.

- Advertisement -

45 वर्षे मुंबईची महानगरपालिका आम्ही जिंकतोय. भले भले मोदी पण येऊन थकले. ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आहे, ही एकनाथ शिंदेची शिवसेना नाही. आले किती गेले किती. सामान्य मराठी माणसाच्या कष्टातून, घामातून, त्यागातून निर्माण झालेली शिवसेना आहे, असा टोला खा. राऊत यांनी गद्दारी करणार्‍यांना लगावला. ठाकरेंची शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष नाही. हा स्वाभिमानी मराठी माणासाचा पक्ष आहे. हा सरळ मार्गाने काम करणार्‍यांचा पक्ष आहे. सत्ता येते, सत्ता जाते. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला नेहमी सांगितलं. आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आपल्यासाठी आहे, आपण जिथे बसू तिथे सत्ता सुरू होते.

कोपरखळी अन् हशा
श्रीगोंद्याचा गमतीशीर इतिहास मी ऐकला. पाचपुत्यांच्या घरात 40-40 वर्षे सत्ता आहे. साजनने सत्ता चांगली भोगली आहे, म्हणजे सत्तेचं अजीर्ण झाल्यामुळे ते आपल्यासोबत आलेले आहेत, अशी कोपरखळी मारताच एकच हंशा पिकला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या