Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्या“केसरकर म्हणजे मोती तलावातील डोमकावळा, शिंदे टोळीने...”; संजय राऊतांची खोचक टीका

“केसरकर म्हणजे मोती तलावातील डोमकावळा, शिंदे टोळीने…”; संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे यांच्या दसरा (Dasara Melava) मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाचा (Shivaji Park Maidan) प्रश्न आता सुटला आहे. मात्र, ही माहिती देताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आम्हाला उद्धव ठाकरेंशी वाद घालायचा नसल्याचे म्हटले होते. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केसरकरांवर खोचक टीका केली आहे.

- Advertisement -

केसरकर म्हणजे सावंतवाडीतील मोती तलावातला डोमकावळा आहे. हा केवळ पदासाठी सत्तेत आला आहे. त्यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता, की हा सत्तेसाठी पाठी खुपसून निघून जाईल. आता आम्हाला खात्री आहे की हा शिंदेच्या पाठीत चाकू खुपसून भाजपत निघून जाईल, असे म्हणत दीपक केसरकरांवर टीका केली आहे.

Accident News : भीषण अपघात! शाळेची बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी बेपत्ता

तसेच संजय राऊतांनी देखील यावरून शिंदे गटावर टीका केली आहे. सध्या कोणत्याही गटाने किंवा टोळीने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा म्हणून कुणी बीएमसी किंवा सरकारकडे अर्ज केला असेल तर त्यांनी आधी स्वतःला विचारावं की आपण शिवसेना आहोत का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे, भाजपच्या नादी लागून लफंगेगिरी करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

जगाच्या पाठीवर जाऊन कुणालाहाी विचारा शिवसेना कुणाची ते बाळासाहेब ठाकरेंनाच ओळखतात. एकनाथ शिंदेंना कोणीही ओळखत नाही. आता माघार घेतली आहे. दिल्लीच्या मदतीनं पक्ष चोरला, चिन्ह चोरलं आणखी काय चोरणार आहेत.

Israel Palestine Conflict : म्युझिक फेस्टिव्हलचं स्मशानभूमीत रूपांतर! हमासने २६० जणांना केलं ठार

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या