Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयSanjay Raut: संजय राऊतांची भैयाजी जोशींवर थेट टीका; म्हणाले, "मराठी माणसात फुट...

Sanjay Raut: संजय राऊतांची भैयाजी जोशींवर थेट टीका; म्हणाले, “मराठी माणसात फुट पाडून झाली आता…”

मुंबई । Mumbai

राज्यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे. राज्यातील बीड हत्या प्रकरणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. भैय्याजी जोशी यांनी मुंबईमध्ये येऊन मराठी भाषेबाबत वक्तव्य केले. यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मुंबई महाराष्ट्रातून तोडायचे आणि मुंबईवरचा मराठीचा जो ठसा आहे तो यांना मिटवायचा आहे, हे काय आता लपून राहिले नाहीये. मुंबईचे महत्व कमी करायचे आहे आणि मुंबई कमजोर करायची. मुंबईतल्या मराठी माणसाची विभागणी करायची आहे. मराठी माणसात फुट पाडून झाली विभागणीही करू झाली.

पुढे राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्याचे जे प्रकार करत आहेत, ते भाजपाचेच लोक आहेत. मंगलप्रभात लोढा हे बिल्डर कोणाचे आहेत? हे भाजपाचेच लोक आहेत आणि अशी अनेक नावे आहेत. हे भाजपाचे अर्थ पुरवठादार आणि देगणीदार आहेत. हे भैय्याजी जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणे, ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे.

फडणवीस अबू आझमींचा निषेध करतात, त्यांना निलंबित करतात, कारण ते मुस्लीम आहेत. पण, प्रशांत कोरटकर ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला, तो अजून का सापडत नाही. त्याला कुणी अभय दिले? कोरटकरचा वावर गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून राज्यपाल, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये कोणाच्या जीवावर फिरतो? तुमचाच आर्शीवाद आहे चिल्लरला? असे राऊत यांनी म्हटले आहे.

राहूल सोलापूरकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बैठका घेतो. हा सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराज भ्रष्ट असल्याचे सांगतो. आग्र्याची सुटका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील दिग्विजय आहे. मात्र, हा सोलापूरकर सांगतो, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्यातून सुटताना लाच दिली.’ एकप्रकारे सोलापूरकर छत्रपतींना भ्रष्ट ठरवतो. सोलापूरकरवर सरकराने आणि फडणवीसांनी काय कारवाई केली? हे औरंगजेबाचे उद्दातीकरण आहे. सोलापूरकरला अटक केली पाहिजे. राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रशांत कोरटकर, भैय्याची जोशी आणि सोलापूरकरबद्दल फडणवीस सरकार शेपट्या घालून का बसले आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...