Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "शरद पवारांचा पक्ष फोडण्यात…"; संजय राऊतांचा गौतम अदाणींवर गंभीर आरोप,...

Sanjay Raut: “शरद पवारांचा पक्ष फोडण्यात…”; संजय राऊतांचा गौतम अदाणींवर गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | Mumbai
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज (रविवार) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या केंद्राचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी आणि पवार कुटुंबातील सर्व दिग्गज नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले आहेत. गौतम अदानी यांचे बारामतीत आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानींसाठी स्वत: कार चालवली. त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याच मुद्द्यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा:BMC Elections: मुंबईत २२७ पैकी भाजप आणि शिंदेंच इतक्या जागांवर ठरलं, तर २० जागांवर आज अंतिम फैसला होणार?

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गौतम अदानींच्या बारामती दौऱ्याबद्दल भाष्य केले. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नाहीत. कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी अदानींना बोलवले असेल. यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारही उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.

YouTube video player

गौतम अदानींच्या भावाचा सहभाग, राऊतांचा खळबळजनक दावा
संजय राऊत पुढे म्हणाले, त्यांनी गौतम अदाणींना बोलावले असेल आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. तर रोहित पवारांनी अदानींच्या गाडीचे सारथ्य का केले, हे त्यांनाच विचारा, असे देखील संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या