Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रराऊतांना शुभेच्छा कधी द्यायच्या 15 एप्रिल की 15 नोव्हेंबरला; नितेश राणेंचा सवाल

राऊतांना शुभेच्छा कधी द्यायच्या 15 एप्रिल की 15 नोव्हेंबरला; नितेश राणेंचा सवाल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) जन्मतारखेत घोळ असल्याचा आरोप करत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी अँफीडेवीटमध्ये दोन वेगवेगळ्या जन्मतारखा दिल्या आहेत असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राऊतांना वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा 15 एप्रिलला द्यायच्या की 15 नोव्हेंबरला असा सवालही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज 15 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. एकीकडे संजय राऊतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतांना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र शब्दांचा प्रहार केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, उबाठा सेनेमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सकट सर्व सोंगाडे आणि 420 भरलेत. एक तो चिपळूणचा सोंगाड्या आणि दुसरा भांडुपचा देवानंद. काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राजाराम राऊतने जरा हे सांगावे 2004 ते 2016 पर्यत राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या अँफीडेवीटमध्ये तुमचा वाढदिवस (Birthday) हा 15 एप्रिल 1961 ला आहे आणि 2016 ते 2028 पर्यत तुम्ही जे अँफीडेवीट भरलं त्याच्या मध्ये तुमचा वाढदिवस 15 नोव्हेंबर 1961 ला आहे. असा सवाल ही केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या