Monday, November 25, 2024
HomeराजकीयSanjay Raut : “आधी भाजप अजित पवारांचा काटा काढणार, नंतर शिंदे गटाचा…”,...

Sanjay Raut : “आधी भाजप अजित पवारांचा काटा काढणार, नंतर शिंदे गटाचा…”, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई | Mumbai

येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे कुरघोडीच्या राजकारणालाही सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

विधानसभेआधी अजित पवारांना एकटे पाडण्याचा डाव असून भाजपा आणि शिंदे गटाकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दावा करत महायुतीच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करत मोठा दावा केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत. हे निर्दयी लोक आहेत, त्यामुळे ते काटा काढतील. अजित पवार यांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्याच्यात शिंदे गटातील लोक सामील आहेत. अजित पवार गेल्यानंतर जास्त जागा मिळतील, हे यामागील राजकारण आहे. तसेच, अजित पवार काकांशी बेईमानी करून आणि इतका मोठा धोका पत्कारून भाजपासोबत आले. पण आता त्यांची गरज संपली आहे. त्यामुळे अजित पवार यांना अडचणीत आणणारी वक्तव्यं आणि भूमिका भाजपा व शिंदे गटाकडून केली जात आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

हे हि वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक, मध्येच सुरू झाला भलताच व्हिडीओ

दरम्यान, भाजपावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, गरज सरो वैद्य मरो, अशी भाजपाची खेळी आहे. त्यामुळे आज जर पहिला बळी अजित पवार यांचा जाणार असेल तर दुसरा बळी शिंदे गटाचा जाणार हे शंभर टक्के खरे आहे. मात्र, भविष्यात महाराष्ट्रातील नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे राहू नये, यासाठीही भाजपाच्या नेत्यांनी दिल्लीत हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्लीतून भाजपाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सगळा खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही एकनाथ शिंदे यांच्याकडून करून घेतला जात आहे.

हे हि वाचा : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या