मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा सधला आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना राऊत यांनी, “एकनाथ शिंदे यांचे पाय लटपटायला लागले म्हणून ते दिल्लीला गेले. सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावाच्या निकालाची तारीख जवळ आली की ते पळत दिल्लीला जातात,” असा टोला लगावला.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे मुंबईत काय अस्तित्व आहे. त्यांना भाजप त्यांच्या मागणीनुसार सीट देणार नाही. एकनाथ शिंदे यांचा आता पक्ष राहिला नाही. त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहे. त्यांना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागणार आहे. त्यांच्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात निभाव लागणार नाही. तसे झाले तर आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल. आमच्या कडे सगळे येत असत आतमध्ये काय चर्चा होतात हे आम्हाला माहित आहे.तुम्ही एखादा चोरलेल्या पक्षाला सगळे हक्क देतात याची दखल घेतली जात आहे. अजून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. बाळासाहेब यांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे १०० पिढ्या आल्या तरी चोरू शकत नाही. कोर्टाला न्याय करावा लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा यांच्या दिल्लीतील भेटीगाठी वाढतात, गृहमंत्री अमित शाहांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात. मोदी आणि शाहांना शिंदेंची जमिनीवरील ताकद किती आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना आमच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या विरुद्ध वापरुन घेतले. अमित शाहांचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महापालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपात विलीन करावा लागेल. यात सत्य आहे, ते त्यांचा पक्ष सुप्रीम कोर्टात बचाव करू शकणार नाही. तसे झाले तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल,” असे राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनतर शिंदेंना पक्ष भाजपात विलिन करावा लागेल असे भाकित राऊत यांनी व्यक्त केले आहे.
“भारतीय संविधानाच्या पुढे वेगळाच संशय निर्माण झाला आहे. तुम्ही एखाद्या चोरलेल्या पक्षाला सगळे हक्क देतात याची दखल घेतली जात आहे. अजून ही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आमचा. पक्ष चोरला, बहुमत चोरले आणि आता दिल्लीच्या फेऱ्या मारत आहेत,” असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला.
फलटणमध्ये डॉक्टर तरुणीचा मृत्यू ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यत्री फलटण दौर्यावर आहेत. फडणवीस स्वतःला गृहमंत्री मानत असतील तर आजच्या कार्यक्रमात ते स्टेज शेअर करणार नाहीत, असेही ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




