Wednesday, November 11, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर खा. राऊतांचं टीकास्त्र म्हणाले,...

Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर खा. राऊतांचं टीकास्त्र म्हणाले, जे स्वत: मर्द अन् कर्तबगार नसतात, त्यांना…!

मुंबई | Mumbai

गोकुळच्या अध्यक्षपदावरुन राजकीय युद्ध रंगले आहे. काल भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसच्या सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर सडकून टीका (Criticism) केली होती. बंटी पाटील हे बंटीच राहिले, ते कधी मोठे झालेच नाहीत. तसेच बंटी पाटील तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त होईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. या टीकेला आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे लोक विध्वंसक विचारांचे असतात. जे स्वत: मर्द अन् कर्तबगार नसतात, त्यांना इतरांच्या कर्तबगारीचा द्वेष वाटतो, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

कोल्हापुरच्या शेतकर्‍यांनी समविचारी पॅनेलला 13 संचालकांचं बहुमत देऊन निवडून दिले. पण देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांच्या (Amit Shah) दबावाखाली गोकुळवर चार शासकीय सदस्य नेमले. अमित शाह यांना गोकुळ हे गुजरातमधील अमुलला (Gujrat Amul) विकायचं आहे. त्यासाठी कोल्हापुरातील (Kolhapur) दोन वळू त्यांना मदत करत आहेत, या वळूंनी काल तांडव केले. त्याचा परिणाम काल दिसला, काल अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही, याला लादणं, ओरबाडणं म्हणतात. कोल्हापूरचा प्रकार लोकशाहीसाठी मारक आहे. यामुळे भाजपच्या सत्तेला सुरुंग लागण्याचं काम झालं हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि चंद्रकांत पाटील यांना असं वागणं शोभत नाही. ते काल शड्डू ठोकून होते. राजकारणात दिवस बदलत असतात, दिवस चंचल असतात. तेव्हा परत पळून जायची वेळ येऊ नये. तेव्हा या वळूंना कोणी दारात उभं करु नये, विशेषत: शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या डी. वाय. पाटलांच्या (D.Y. Patil) संपत्तीविषयक विधानांवरून खा. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार प्रत्युत्तर दिले. म्हणाले की, स्कूटरवरून फिरणार्‍या एका व्यक्तीने स्वतःच्या हिमतीवर जागतिक शैक्षणिक साम्राज्य उभे करणे ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. राऊतांनी पाटलांना उलट सवाल करत, मोदी चहा विकत होते आणि अदानी स्कूटरवर फिरत होते, तर त्यांचे वैभव कसे उभे राहिले, अशी विचारणा केली. तसेच, पाटलांनी कोथरूडमध्ये (Kothrud) मतांसाठी वापरलेल्या पैशांच्या स्त्रोतावरही राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही मंत्र्याची भाषा नाही, असे म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाटलांना आवर घालावा, अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

DCM Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच सुचक वक्तव्य;...

0
मुंबई | Mumbaiमागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवार गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी...