Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut on Raj Thackeray : "राज ठाकरे हे भाजपच्या हातातले खेळणे,...

Sanjay Raut on Raj Thackeray : “राज ठाकरे हे भाजपच्या हातातले खेळणे, त्यांनी…”; संजय राऊतांचा निशाणा

मुंबई । Mumbai

राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात, आम्हाला त्यांना सोबत घेण्यात रस, पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेऊन असं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्यावरुन संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंना भाजपाकडून खेळवले जात आहे. राज ठाकरे त्यांच्या हातातील खेळणे झाले आहे, हे स्पष्ट दिसत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्या विधानातून हे स्पष्ट झाले आहे की, भाजपा सांगेल त्या पद्धतीने भूमिका घेत आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आता काही बोलायचे नाही. लोकसभेत, विधानसभेत आता महानगरपालिकेत मनसेने काय करायचे, हे देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत.

तसेच, एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईत मराठीत न बोलता गुजराती, मारवाडीत बोला असा भाजपाचा आग्रह आहे. मराठी लोकांवर दबाव आहे. त्या भाजपाचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कुणाबरोबर जावे, हे पत्ते पिसत बसले असतील तर त्याबाबत राज ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली पाहीजे. असाही संजय राऊत म्हणाले. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असेही संजय राऊत म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...