Thursday, September 19, 2024
Homeराजकीयनाट्यसृष्टीने पवार, फडणवीस अन् शिंदेंकडे दुर्लक्ष केलं; संजय राऊतांची खोचक टीका

नाट्यसृष्टीने पवार, फडणवीस अन् शिंदेंकडे दुर्लक्ष केलं; संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी शनिवारी दिल्लीमध्ये (Delhi) पत्रकारांशी संवाद साधताना आपण वेश बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) भेटण्यासाठी सत्तेत सामिल होण्यापूर्वी जवळपास दहा बैठकांसाठी आले होते असा खुलासा केला. तसेच या बैठकीला जाताना ते मास्क आणि टोपी घालून जायचे, असंही खुद्द अजित पवार यांनी सांगितलं आहे.

यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena UBT) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर यांच्यावरही टीका केली आहे. तसेच, राज्यात भाजपाचे (BJP) राज्य नसताना एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेल (Ahmed Patel) यांना भेटायला जायचे, असा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर

भाजपाचे महाराष्ट्राबाबत कपट किती आधीपासून सुरु होते, हे हळू हळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. श्रीराम लागूंपासून ते प्रशांत दामलेंपर्यंत असे मोठे कलाकार महाराष्ट्राच्यानाट्यश्रृष्टीने दिले आहेत. आपल्या राज्याला नाट्यश्रृष्टीची मोठी परंपरा आहे. मात्र, या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. यांनाही नाट्यसृष्टीत सामावून घेतलं पाहिजे, असा खोचक टोला संजय रौतानाही लगावला आहे.

हे तिन्ही लोकं उत्तमपणे मेकअप करतात. त्यांचे चेहरे बदलतात. अजित पवार हे एका गुप्तहेराप्रमाणे नाव आणि चेहरा बदलून, खोट्या मिशा लाऊन दिल्लीत अमित शाह यांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रात्री वेश बदलून रस्त्यावरच्या दिव्या खाली बसून सरकार कसं पाडायचं, यावर चर्चा करत होते. ही फार मोठी गोष्ट आहे. हे लोक मोठे कलाकार आहेत. यांनी राजकारणात येऊन आपल्या नाट्यसृष्टीचं मोठ नुकसान केलं आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

तसेच, आता खोट्या कथा लिहून एकनाथ शिंदे चित्रपट काढत आहेत लोक. मात्र त्यांनी हे जे काही स्वत:वर नाटक रचलं त्यावर त्यांना लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो. मला प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. एकनाथ शिंदे आतापासून वेश बदलून जात नव्हते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जात होते. हे पृथ्वीराज चव्हाण उत्तमप्रकारे सांगू शकतील, असं सूचक विधान राऊत यांनी केले आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पाठींबा; पवारांची ‘मराठा मोर्चा’शी चर्चा

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या पोटात आणि ओठात काय आहे याकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे त्यामुळे ते लाडक्या बहिणींचा उद्धार कसा करणार..त्यांनी स्पष्ट करायला हवं, कारण राज्याच्या अर्थ खात्यानं आक्षेप घेतला आहे. तसेच, पियूष गोयल (Piyush Goyal) याच्यावर काय आरोप आहेत ते आम्हाला बोलू नका. अमित शहांवर तडीपारीची नोटीस, ते तुरुंगात होते. खुनाचा खटला गुजरातच्या (Gujrath) बाहेर चालवावा हे सर्वोच्च न्यायालयानंच सांगितलं होतं असंही ते म्हणाले.

हे ही वाचा : “… तर राजकारणातून संन्यास घेईल”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या