मुंबई | Mumbai
काल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असतानाही भाजपशी चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटून भाजपला (BJP) साथ देण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे भाजपासह जाण्याचे पत्र तयार होते, असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे…
Sharad Pawar : “अजित पवार मुख्यमंत्री होतील पण…”; शरद पवारांचा दादांना चिमटा, भुजबळांवरही साधला निशाणा
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महाराष्ट्रात २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी स्थापन होण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा भुजबळ तुरुंगातून नुकतेच सुटून आले होते. भुजबळांना तेव्हा काय घडलं ते माहित नव्हतं. भाजपाला बाजूला सारुन सरकार झालं पाहिजे ही भूमिका होती. मी त्या प्रक्रियेत होतो मला सगळ्या गोष्टी माहित आहेत. छगन भुजबळ हे आता काय म्हणत आहेत त्याला महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हवं होतं, त्यांना ईडीपासून संरक्षण हवं होतं ते सगळं त्यांनी भाजपाबरोबर जाऊन घेतलं आहे. पण भुजबळांना सांगू इच्छितो फाईल कधीही बंद होत नाहीत. २०२४ ला नव्या प्रोटेक्शनसाठी भुजबळ कोणत्या पक्षात असतील ते बघावं लागेल,” असे म्हणत संजय राऊत यांनी भुजबळांचे दावे खोडत त्यांना टोला लगावला आहे.
Dasara Melava : “एक पक्ष, एक नेता…”; शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून टिझर प्रदर्शित
तसेच नाशिकमध्ये (Nashik) मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले असून त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करतील. ससूनमध्ये इतके दिवस तो व्यक्ती कसा राहिला. तो जेलमधून कसा बाहेर आला? त्याला कुठल्या भाजपच्या माणसाने मदत केली हे सगळ रेकॉर्डवर आलेले आहे. सर्वात आधी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे ते पुराव्यांसंदर्भात छेडछाड करत आहेत, असे म्हणत राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी तयार होण्याआधी भाजपाबरोबर जायचं हे शरद पवारांनी ठरवलं होतं मात्र ऐनवेळेस त्यांनी माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन ते सांगून आले की मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हाही भाजपसह जायचं या चर्चा झाल्या होत्या. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही मोदींना शब्द दिला होता की आपण सरकार स्थापन करु. या सगळ्या गोष्टींचा शब्द अजित पवारांनी पाळला पण शरद पवारांनी फिरवला. त्यामुळेच पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचे बंड नव्हते, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांनी छगन भुजबळांचा हा दावा खोडून काढला आहे.