Wednesday, May 15, 2024
HomeनाशिकSanjay Raut : "केंद्र सरकारची कांदा निर्यातीची घोषणा म्हणजे निव्वळ..."; संजय राऊतांचा...

Sanjay Raut : “केंद्र सरकारची कांदा निर्यातीची घोषणा म्हणजे निव्वळ…”; संजय राऊतांचा नाशकातून हल्लाबोल

नाशिक | Nashik

सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहेत. दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार (दि.७ मे) रोजी होणार आहे. मात्र, त्यानंतर होणाऱ्या उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)आणि कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित राहणार आहेत. मात्र, अर्ज भरण्याआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष फोडले. त्यामुळे त्यांना याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार आहे. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी अनेकदा खोटे बोलले आहेत त्यामुळे एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान आजपर्यंत बघितला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने जी कांदा निर्यातीची घोषणा केली आहे ती घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक, खोटारडेपणा आहे. गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहचवणे हा निर्यातबंदी उठवण्यामागील उद्देश आहे. त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठलाही फायदा नाही. त्यामुळे ही नुसती धूळफेक आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तसेच नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. तर दुसरीकडे महायुतीला नाशिकमध्ये आमच्या उमेदवारांसमोर उमेदवारच मिळत नाही. नाशिकच्या जागेसाठी महायुतीकडून आम्हाला समोर गद्दारच हवा असून त्याला आम्ही गाडणारच, असे म्हणत राऊतांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या