Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकरी वाऱ्यावर अन् राज्याचे कृषीमंत्री चिंतन शिबिरात; संजय राऊतांची दादा भूसेंवर टीका

शेतकरी वाऱ्यावर अन् राज्याचे कृषीमंत्री चिंतन शिबिरात; संजय राऊतांची दादा भूसेंवर टीका

मुंबई | Mumbai

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या बंडखोरीवरून खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे…

- Advertisement -

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊस कमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषीमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री कृपया आपण लक्ष द्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आम्हाला कायदा शिकवू नका; १२ आमदारांच्या कारवाईवर एकनाथ शिंदे म्हणाले…

दरम्यान, काल दादा भुसे गुवाहाटी यथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासह आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak), किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक (Sachin Naik) आणि आमदार संजय राठोड (Sanjay Rathore), हेदेखील गुवाहाटीत पोहोचले आहे. आणखी किती शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जातात हे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या