Thursday, June 13, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांचे कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का?; एल्विस प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांचे कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का?; एल्विस प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

बिग बॉस ओटीटी- 2 चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नोएडा इथे एका रेव्ह पार्टीमध्ये छापा मारल्यानंतर तिथून अनेक विषारी साप आणि सापाचं विष जप्त केलं आहे.

पण या सगळ्या प्रकरणात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्याचं झालं असं की, एल्विश यादवचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो ठाकरे गटाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर करत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

शिंदेंच्या राजकीय परिवारची ड्रग्ज प्रकरणात चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात एनसीबी काय करत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात माफियागिरी वाढली असून त्यांचे केंद्र मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. इतकेच नाही तर आता हे लोन वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी या प्रकरणाची उत्तरे द्यावी, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केला आहे. या व्यक्तीला वर्षा बंगल्यावर कुणी आमंत्रित केलं होतं? मुख्यमंत्र्यांच्या निवासाशी त्याचा काय संबंध आहे? मुख्यमंत्र्यांचं कुटुंब किंवा मुख्यमंत्र्यांचे राजकीय कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का? असे अनेक प्रश्न या वेळी खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

बिग बॉस ओटीटी-2 चा विजेता एल्विस यादव याला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी घेऊन जाणारा खासदार देखील ड्रग्ज घेतो अशी आपल्याकडे पक्की माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याची माहिती तुम्ही देता का मी देऊ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुम्ही तोंड उघडा नसता मी तोंड उघडले तर तुमचे तोंड देखील बंद होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या