Friday, November 22, 2024
Homeराजकीय“बिनशर्ट' पाठिंबा देणारे आता…”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

“बिनशर्ट’ पाठिंबा देणारे आता…”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

मुंबई । Mumbai

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी मुंबईतील (Mumbai) पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे (Shivsena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राज ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे नुकतेच परदेशातून आलेत, बराच काळ ते परदेशात होते, त्यामुळे त्यांना राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. काही दिवसापूर्वी त्यांनी मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिनशर्ट म्हणजे उघडा पाठिंबा दिला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

हे ही वाचा : “माझ्याविरोधातील व्हिडीओ क्लिप जाहीर करा”; अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज

बिनशर्त पाठिंबा दिला जणू काही महाराष्ट्रावर फार मोठे उपकार करण्यासाठी, मोदी आणि शहांचा जन्म झालाय. ज्या महाराष्ट्रात मोदी शाहांना पाय ठेवू देणार नाही असं जे म्हणाले होते, त्यांना राज ठाकरेंनी बिनशर्ट पाठिंबा दिलाय आणि आता एकाच महिन्यात त्यांची भूमिका बदलली. असा टोला राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षांनी ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल. यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही, काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहे, अशी टीकादेखील राऊतांनी केली आहे.

हे ही वाचा : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी; बंद दाराआड काय चर्चा झाली?

राज ठाकरे काय म्हणाले?

आगामी निवडणुकीत आपल्या मनसेचे (MNS) लोक सत्तेत काहीही करून बसवायचे आहेत.काही लोक हसतील, पण हे घडणार म्हणजे घडणारच. आम्ही सगळेजण त्या तयारीला लागलो आहोत. मी तयार केलेल्या टीम पुन्हा आता प्रत्येक जिल्ह्यात येतील.ते तुमच्याकडील माहिती जाणून घेतील. त्यांना मतदारसंघातील मूळ परिस्थिती समजावून सांगा. काय गोष्टी होऊ शकतात, याचा विचार करा. मी पाठवलेल्या मनसेच्या पथकांना योग्य माहिती द्या, युती होईल का? आघाडी होईल का? असा काही विचार करू नका, विधानसभेला आपण २२५ ते २५० जागा लढवणार आहोत.

विधानसभा निवडणुकीत (VidhanSabha Election) मनसेकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल. तिकीट मिळाले की मी पैसे (Money) काढायला मोकळा अशा मनोवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिले जाणार नाही. जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आहेत, त्यांनी माहिती नीट द्या, तुमची माहिती चेक होणार आहे. त्यामुळे काय परिस्थितीत आहे. काय घडू शकते, याचे आकलन करा.

हे ही वाचा : पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; जरांगेंचे पहिल्यांदाच विरोधकांना आवाहन

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या