मुंबई | Mumbai
आज शिवसेनेचा (Shivsena)५७ वा स्थापना दिवस असून त्यानिमित्ताने दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन होणार असून ठाकरे गटाचा (Thackeray Group) पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या कार्यक्रमावर निशाणा साधला आहे…
यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापनदिन (Anniversary) असून या ५७ वर्षांत अनेक चढ-उतार आले. कठीण काळानंतरही शिवसेना पुन्हा उभी राहिली. शिवसेनेने दिल्लीपर्यंत धडक मारली. देशाच्या अनेक प्रश्नांमध्ये शिवसेनेने योगदान दिले. जम्मू काश्मीरपर्यंत शिवसेना गेली. त्यामुळे ज्यांना वाटत या गद्दारांच्या बंडामुळे शिवसेना संपेल तर तसे होणार नाही. शिवसेना पुन्हा उभी राहिल,” असे राऊतांनी म्हटले.
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “त्यांना (शिंदे गट) शिवसेनेच्या स्थापना दिवसाची तारीख माहिती नाही. ते शिवसेनेवर दावा सांगत आहेत. निवडणूक आयोगाकडून कागद आणत आहेत. बोगस सातबारा! हा अब्दुल सत्तारांनी लिहिलेला सातबारा आहे, ५९ वा वर्धापन दिन. यांना तारीख माहिती नाही,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर (Shinde Group) हल्लाबोल केला.
राऊत पुढे म्हणाले की, उद्या २० जून म्हणजे जागतिक गद्दार दिन आहे. हा दिवस जगभर साजरा करण्यासाठी आम्ही युनोला पत्र देणार असून उद्याचा दिवस गद्दार दिन साजरा करण्याची मागणी शिवसेना आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने युनोकडे करणार आहोत. २० जून हा सर्व जगातील गद्दारांसाठींचा दिवस राहणार असून यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल. याशिवाय आमचे सरकार आल्यावर आम्ही दरवर्षी २० जून रोजी गद्दार दिवस साजरा करू आणि या दिवशी ४० गद्दारांचे रावणासारखे दहन करू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या ३ चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये सापडले, नेमकं काय घडलं?