Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांनी बावनकुळेंना डिवचलं; म्हणाले, खरी मिरची झोंबायची...

संजय राऊतांनी बावनकुळेंना डिवचलं; म्हणाले, खरी मिरची झोंबायची…

मुंबई | Mumbai

‘सामना’(Samana) वृत्तपत्राच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्र सोडण्यात आले आहे. फडणवीस हे ‘मुख्य’चे ‘उप’ झाल्यापासून अस्वस्थ आहेत. एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जात आहेत, फडणवीसजी सांभाळा, अशा आशयाची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. पण सामनामधील या लिखाणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

नियमाच्या बाहेर जाऊन, वृत्तपत्रांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन एखादे वृत्तपत्र लिखाण करत असेल तर ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा बावनकुळे यांच्याकडून ठाकरे गटाला (Thackeray Group) देण्यात आला आहे.

तर, दुसरीकडे बावनकुळे यांनी सामनात करण्यात येणाऱ्या लिखाणाबाबत इशारा दिल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा बावनकुळे यांना डिवचण्याचे काम केले आहे. अग्रलेखाच्या माध्यमातून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली नाही. आम्ही फक्त त्यांना आरसा दाखवला आहे.

Maharashtra Politics : “सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात मुख्य खुर्ची बदलणार”; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंना एवढ्या मिरच्या झोंबायचे कारण काय? अजून त्यांना खरी मिरची झोंबायची बाकी आहे. त्यासाठी वेळ आहे, थांबा जरा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे सद्गृहस्थ आहेत. संस्कारी गृहस्थ आहेत. जुन्या भारतीय जनता पार्टीशी संबंधित म्हणजेच गडकरींनी उल्लेख केलेल्या पक्षाचे नेते आहेत. देवेंद्रजी म्हणाले होते की, आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन आलो. आता आम्ही त्यांना केवळ आरसा दाखवला.”

संभु जळाला तरी पिळ कायम; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

तसेच, २०१४ मध्ये आम्ही युती तोडली नाही. भाजपच्या घमंडामुळे ती युती तुटली. एका जागेसाठी तुम्ही शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडली आणि २०१९ मध्ये अमित शहांसमोर बोलणे झाले होते की ५०-५० फॉर्म्युला करणार म्हणून. पण जेव्हा आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी दिले त्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही असे सांगत त्यांनीच युती तोडली, असे सांगत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या