Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "तर तो सावरकरांचा गौरव झाल्यासारखे असेल…"; बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यावरुन...

Sanjay Raut: “तर तो सावरकरांचा गौरव झाल्यासारखे असेल…”; बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यावरुन राऊतांचे मोठे विधान

मुंबई | Mumbai
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. बाळासाहेब ठाकरे आज आपल्यासोबत नाहीत. त्यांनी हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. “प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील”, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मात्र, यावरून संजय राऊतांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज ९९वी जयंती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानाने जगायला शिकवले, असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी सर्व राजकीय पदे सहकाऱ्यांना दिली होती. स्वत: कधीही कुठल्या पदावर आले नाहीत. बाळासाहेबांनी शिवसेनेत गट कधी तयार केला नाही. मार्केटमध्ये ब्रँडच्या काही ड्यूप्लिकेट गोष्टी येतात, अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केलीय.

- Advertisement -

“जिथे मातोश्री आहे, तिथे शिवसेना आहे. बाजारात डुप्लीकेट औषध असतात, कपडे असतात, असा शिवसेनेच्या नावाने चायना माल बाजारात आला असेल तर तो तात्पुरता असतो. दिवाळीत चिनी फटाके येते. वात पेटते पण वाजत नाही. अशा गोष्टी भाजपाकडून निर्माण झाल्या आहेत. भाजपा स्वत: चिनी माला आहे. म्हणून ते राजकारणात चिनी मालाचा पुरवठा करत असतात” अशी ही टीका संजय राऊत यांनी केली.

“आम्ही चोऱ्या, माऱ्या, लांड्या, लबाड्या करून राजकारणात थांबलेलो नाही. बाळासाहेबांचा एक विचार होता. बाळासाहेबांना ढोंग आवडत नसून ते त्यावर हल्ला करत होते. या देशाच्या राजकारणात हिंदूत्वाच्या नावाने जे ढोंग सुरू आहे, त्या ढोंगाचं प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना करत आहे. हाच बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाहीत. आम्ही प्रतिकूल परिस्थितीत काय झुंज दिली हे अमित शाहांना माहितच नाही. या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शाहांविरोधातही झुंज देत आहोत. अमित शाहांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी परिस्थिती केलीय, अशा प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही संघर्ष करत उभे आहोत, ही आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे. मतांसाठी त्यांचे नाव घेतले म्हणजे ती प्रेरणा ठरत नाहीत. बाळासाहेब ठाकरे कृतीशील हिंदूहृदय सम्राट होते. हातात कोणतीही सत्ता नसातना त्यांनी लढा दिला आणि त्याचे परिणाम भोगले. सत्ता नसताना मराठी माणसासाठी लढा दिला. शिवसेनेसारखी कवच कुंडले तयार केली. ही कवच कुंडले अमित शाहांनी आणि नरेंद्र मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माझं आव्हान आहे की, ही ढोंग बंद करा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नाने सन्मानित करा, तरच तुम्ही खरे असाल. ही शिवसेनेची मागणी आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. देशात मोदी-शहा आल्यापासून नियम डावलून जे लोकं भारतत्नाला योग्य नाहीत, त्यांनाही तुम्ही भारतरत्न दिला. पण ज्यांनी हिंदूत्वाचं बीज रोवले आणि वाढवले, त्या बाळासाहेबांना भारतरत्न का दिला नाही, २०२६ पासून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. त्याआधी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही आमची मागणी आहे. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिलास, तो वीर सावरकरांचा गौरव झाल्यासारखे असेल”, अशी मागणीही यावेळी संजय राऊत यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...