Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "पाच वर्षानंतर त्याचं म्हणणे आहे की"…'; दिशा सालियन मृत्यू प्रकरणी...

Sanjay Raut: “पाच वर्षानंतर त्याचं म्हणणे आहे की”…’; दिशा सालियन मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी सतीश सालियन यांनी
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. “या देशात महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरण घडत असतात कुटुंबीय, आई-वडिल हे न्यायासाठी समोर येतात. न्याय मागण्याचा प्रयत्न करतात. पोलीस तपासाला सहकार्य करतात. ही एक प्रथा आहे. पाच वर्षानंतर त्याचं म्हणणे आहे की, आमच्यावर दबाव होता. यावर कसा विश्वास ठेवणार तुम्ही” असे संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?
हे प्रकरण ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. ते म्हणाले की, “ज्यांच्या मुलीचे निधन झाले ते आई-वडील पाच वर्ष गप्प बसत नाहीत अशी माझी भावना आहे. महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. कुटुंबिय, आई-वडील हे न्यायासाठी समोर येतात, पोलीस तपासाला सहकार्य करतात. पाच वर्षांनंतर त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्यावर दबाव होता, यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार आहात? या माध्यमातून ठाकरे कुटुंबाला आणि आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्याने जो प्रयत्न सुरू आहे तो स्पष्ट दिसतो आहे.”

- Advertisement -

औरंगजेब त्यांच्यावरच उलटला
औरंगजेबाला कबूरीतून बाहेर काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला. पण औरंगजेब त्यांच्यावरच उलटला. म्हणून औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी मागच्या चार दिवसांपासून हे प्रकरण शिजत आहे. यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हलचाली करत होतं? याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. असे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाभ ठरो,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

अनेक कबरी तुम्ही खोदत आहात, त्यात तुम्हाला जावे लागेल
औरंजेबाला ४५० वर्षानंतर कबरीतून बाहेर काढल्यावर अशा अनेक कबरी तुम्ही खोदत आहात, त्यात तुम्हाला जावे लागेल,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे. “एका तरुण नेत्याच्या भविष्यावर, करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर हे प्रयोग झाले. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. तरीही तुमचे आयटी सेल काम करत आहे. पण कोणत्या थरापर्यंत जायचे हे एकदा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.

तर जस्टिस लोहिया सोहराबुद्दीन यांची कबर उकरावी लागेल
“भाजपच राज्य आल्यापासून भाजपात काही बाडगे गेल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून ते जे अस्वस्थ आहेत, त्यांच्या हाताला काही लागत नाहीय. प्रतिष्ठा मिळत नाहीय. त्यातून अस्वस्थतता आहे” असे संजय राऊत म्हणाले. “शिवसेना इतके हल्ले पचवून, आक्रमकपणे पुढे चालली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्याने उभा राहिला आहे. ही एक पोटदुखी आहे, भिती आहे. मग अशा कबरी उकरायच्या म्हटल्या, तर जस्टिस लोहिया, सोहराबुद्दीन यांची कबर उकरावी लागेल तसेच महाराष्ट्रात कोकणात रमेश गोवेकरांपासून अंकुश राणे, सत्याविजय भिसेंपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अशी शेकडो थडगी आणि त्यांचा तपास नव्याने करावा लागेल” असे संजय राऊत म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...