Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याWomen Reservation Bill : महिला आरक्षणाबाबत बाळासाहेबांची भूमिका काय होती? संजय राऊतांनी...

Women Reservation Bill : महिला आरक्षणाबाबत बाळासाहेबांची भूमिका काय होती? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली | New Delhi

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनामध्ये विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाची (Women Reservation Bill) घोषणा केली. त्यानंतर देशात महिलावर्गासह सर्वत्र त्याचे स्वागत करण्यात आले. मात्र त्यावरुन आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राऊत यांनी महिला आरक्षणाबद्दल बाळासाहेब ठाकरेंचे काय मत होते, हे देखील स्पष्ट केले…

- Advertisement -

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; जंगली प्राणी आडवा आल्याने भरधाव कार उलटली

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, महिला विधेयकामुळे महिलांना राजकारणात (Politics) मोठी संधी मिळाली, त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते अगदी लोकसभेपर्यंतच्या राजकारणात महिलांच्या राजकीय नेतृत्वाला संधी मिळत गेली. मात्र घराणेशाहीमुळेही त्याचा तोटा सहन करावा लागला आहे. तसेच ज्या नव्या संसद भवनात (New Parliament Building) मोदी सरकारने विधेयक आणले त्या भवनाच्या उद्घाटनापासून महिला राष्ट्रपतींना रोखले होते. २०२४ ला हे सरकार राहील की नाही हे माहीत नाही, तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल, पण असा कोणी कायदा करत असेल तर याचे स्वागत केले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बंद; व्यापारी संपावर, ‘हे’ आहे कारण

तसेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे महिला आरक्षणाबद्दल काय मत होते हे सांगतांना राऊत म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महिला आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. ते म्हणत महिलांना थेट जागा देण्यापेक्षा राजकीय पक्षांवर बंधने घालून त्यांना ३३ टक्के महिला निवडून देण्याबाबत नियम करावा, असं ते म्हणाले होते, असे खासदार संजय राऊतांनी सांगितले.

Nashik News : मनमाडला ताब्यात घेतलेला ‘तो’ संशयित दहशतवादी नव्हे तर…; काय आहे प्रकरण?

पुढे ते म्हणाले की, देशात एकीकडे महिला आरक्षणावर जोरदार चर्चा करुन महिला आरक्षण विधेयकाची घोषणा करण्यात आली. मात्र देशातील महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे देशात महिलांसाठी अनेक कायदे करुनही निर्भयांचे बळी जात असल्याची चिंता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारकडून अनेक नवनवे निर्णय घेण्यात येत आहेत. काही निर्णय घाईगडबडीने घेतले जात आहेत, असेही राऊत यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Parliament Special Session : महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसकडून समर्थन; सोनिया गांधी म्हणाल्या…

- Advertisment -

ताज्या बातम्या