Sunday, December 15, 2024
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : ...तर लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल;...

Sanjay Raut : …तर लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल; संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी भीती

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’ची येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई येथे महत्वाची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहेत…

- Advertisement -

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला ‘हा’ अंदाज, वाचा सविस्तर

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “राम मंदिराच्या (Ram temple) उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावले जाईल. यातील एखाद्या दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक (Stone Throwing) केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलं असे म्हटले जात आहे. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल, अशी भीती देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पण आम्ही अत्यंत सावध आहोत”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

‘मी अजून दारूला …; द्राक्ष बागायत संघाच्या परिषदेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “सत्यपाल मलिक (Satyapal Malik) म्हणाले की पुलवामा झाला नाही केला गेला. गोध्राबाबतही असंच म्हटले जातं आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल, अशी भीती आम्हा सर्वांच्या मनात आहे. बाबरी अयोध्येचा मुद्दा संपलेला आहे. हा मुद्दा काढणारा मुर्ख आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा संपवला म्हणूनच तिथे राम मंदिर होत आहे, त्याचं श्रेय कोणी घेऊ नये. त्याचं श्रेय घ्यायचे असेल जे हजारो करसेवक मारले गेले त्यांना द्यावं लागेल, त्यात शिवसेनेचा सहभाग आहे” असेही संजय राऊत यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा; ठाकरेंना उत्तर देणाऱ्या कावड यात्रेत फिरवली तलवार

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या